Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra: Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री, पालकमंत्रिपदानंतर सुनेत्रा पवारांसाठी देवेंद्र फडणवीसांच्या गृह विभागाचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis Sunetra Pawar Granted Z Security : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर गृहविभागने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खाते वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारी देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली.

उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर अजित पवारांकडे असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देखील सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. आता फडणवीस यांच्या गृह विभागाकडून सुनेत्रा पवार यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गृहविभागाने सुनेत्रा पवार यांची वाय प्लस सुरक्षा व्यवस्था हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

झेड प्लस सुरक्षा व्यवस्था...

झेड प्लस सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्वाच्या व्यक्तिंना पुरवली जाते. या सुरक्षे व्यवस्थेत 10 कमांडोची तुकडी, 55 सुरक्षा कर्मचारी तसेच बुलेप्रफुल वाहन पुरवले जाते. तसेची ही सुरक्षा व्यवस्था 24 तास संबंधित व्यक्तिसोबत असते.

उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांनी पदाचा कार्यभार अजून स्वीकारलेला नाही. अजित पवारांच्या निधनामुळे ते सध्या बारामतीमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सातारचा दौरा करत कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT