

Uddhav Thackeray Politics : मुंबई महापालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे प्रमुख नेते, पालिकेतील गटनेते, वरिष्ठ नगरसेवक यांच्या सोबत बैठक बोलावली आहे. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या संदर्भात रणनीती निश्चित होणार आहे.
भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला महापालिकेत स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक लढायची की नाही यावरून मतमतांतरे होती. ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी ही निवडणूक लढायला हवी, असा आग्रह धरल्याची माहिती आहे. निवडणूक लढली तर ठाकरेंचा पक्ष लढणार आहे, असा संदेश जाईल, अशी भावना नेते व्यक्त करत आहेत.
निवडणूक लढायची की नाही याबाबत उद्धव ठाकरे आज निर्णय घेणार आहेत. तसेच निवडणूक लढायची ठरल्यास महापौर पदाचे उमेदवार म्हणून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावर देखील खल होणार आहे.
आजच्या बैठकीमध्ये निवडणूक लढण्यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ८ फेब्रुवारी पर्यंत मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.