Sunetra Pawar News : राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीत धुसपूस दिसून येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठे विधान केले. त्या म्हणाल्या, 'एकमेकांबद्दल काही बोलण्यापेक्षा, काही गैरसमज असेल तर चर्चेतून दूर केल्या पाहिजेत.'
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या. सफर मे मुश्किल है तो हिम्मत और बढती है, कोई रास्ता रोके तो जरूरत और बढती है, असा शेर सांगत त्यांनी सध्या परिस्थिती विषद केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'महायुतीत कोणताही वाद नाही , कारण बरेच जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर असतात आम्ही महायुतीतील सर्वच घटक पक्ष एकसंघ आहोत.आपण सर्वांनी एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे.'
'या निवडणुकीत आपल्याला पक्षीय समन्वय राखून एक दिल्याने काम करायचा आहे.सर्वांनी ही निवडणूक आपली समजली पाहिजे.काही गैरसमज असतील तर ती चर्चेतून दूर केला पाहिजे', असा सल्ला सुनेत्रा पवार यांनी दिला.
महायुतीची ही आपली एकजूट आपली ताकत आहे. हे लक्षात असू दिले पाहिजे. वेगवेगळे प्रचार न करता एकाच निष्ठेने आणि ताकदीने काम करा, असे देखील त्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. महायुतीमधील पक्षातील नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर येत आहे. पुण्यामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.