MLC Election : अमरावती मतदारसंघात ट्विस्ट! मोठ्या शिक्षक संघटनेची पलटी; अधिकृत उमेदवाराला नारळ देत भाजप नेत्याच्या बहिणीला पाठिंबा

MESTA announces support News : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने रंगत येणार आहे.
Amravati Teachers Constituency
Amravati Teachers ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर ‘मेस्टा’ (MESTA) या मोठ्या संघटनेने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. सुरुवातीला ज्या उमेदवाराला मैदानात उतरवले होते, त्याच्यावरच उलट आरोप करत संघटनेने त्याची उमेदवारी तडकाफडकी रद्द केली... एवढेच नव्हे तर, आता डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांना मेस्टा संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

मेस्टा संघटनेने डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांना संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने रंगत येणार आहे. या मतदारसंघातून मेस्टा संघटनेने किरण चौधरी यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

निवडणुकीच्या ऐन तोंडावर किरण चौधरी यांच्याकडून निवडणुकीचे नियोजन योग्य पद्धतीने न होणे, वरिष्ठांच्या निर्देशांचे पालन न करणे आणि संपर्कात न राहण्याच्या कारणावरून मेस्टा संघटनेने त्यांची अधिकृत उमेदवारी रद्द करत त्यांचा पाठिंबा काढून घेत त्यानंतर डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांना पाठिंबा जाहीर केला.

Amravati Teachers Constituency
Shivsena News : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिपदावर नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी, 'त्या' नेत्यांना मिळणार डच्चू ?

मेस्टा संघटनेच्या या अचानक झालेल्या युटर्नमुळे आणि पलटी मारण्याच्या राजकारणामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली आहे. याठिकाणी शिवसेनेकडून (Shivsena) विद्यमान आमदार किरण सरनाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Amravati Teachers Constituency
Pradeep Purnekar Murder Case : मंत्री प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबियांना संताप अनावर : मिनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप, पदावरून हकालपट्टीची मागणी

दुसरीकडे या मतदारसंघातून माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी बंडखोरी करीत मैदानात उडी घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) अदिती पोहरे निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय भाजपकडून डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांच्यासह तीन जणांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस पाहवयास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com