Shivsena Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैराग नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष सुजाता डोळेसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी एकनाथ शिदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
बार्शी तालुक्यातील नूतन वैराग नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती. १७ पैकी तब्बल 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादीकडून सुजाता डोळेसे यांना मिळाला होता. मात्र, अवघा सहा महिन्यातच त्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह नगरसेवकही शिवसेनेत गेल्याने आता वैराग नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असणार आहे. दरम्यान, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
वैरागच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सांगोलातील धनगर समाजाचे नेते सरपंच रविकांत मेटकरी, बार्शीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्यासह बहुजन हक्क अभियानाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.