Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार सकारात्मक? म्हणाल्या,'जशी वेळ येईल..'

Sunetra Pawar NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.पक्षहिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य असेल, तो घेण्यास सुनेत्रा पवार या सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले.

Roshan More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची आमदार शरद पवारांना भेटायला जाण्याबाबत देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.

त्यावर त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की,जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतीलच."

पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर थेट उत्तर देणे टाळत त्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मिटकरी म्हणाले की, त्यांचे हे विधान अत्यंत मुत्सद्दी आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'वेट अँड वॉच' करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

निर्णय घेण्यास सक्षम

विलीनीकरण करायचे की नाही, यापेक्षा पक्षहिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य असेल, तो घेण्यास सुनेत्रा पवार पूर्णपणे सक्षम आहेत, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. पक्षातील सर्व घटकांच्या मतांचा सारासार विचार करूनच त्या पुढील योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT