भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र पुस्तकावर प्रश्न उपस्थित केले आहे. "हे कसले रिलाँच आहे? सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात संजय गांधी यांना खलनायक, तर राजीव गांधी यांना नायक म्हणून दाखवले आहे. संजय गांधी, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यापैकी आज कोणीही हयात नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यांना उत्तर कोण देणार? त्यांनी जे लिहिले आहे, ते योग्य की अयोग्य, हे शेवटी कोण ठरवणार? जर सोनिया गांधी यांचा आणीबाणीला एवढा विरोध होता, तर 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी संजय गांधी यांना उमेदवारी का दिली? त्याऐवजी राजीव गांधी यांना उमेदवारी का दिली नाही? असे प्रश्न खासदार निशिकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.