jay Pawar Sunetra Pawar Praful Patel  sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, सुनेत्रा पवार-प्रफुल पटेलांमध्ये बैठक, पार्थ, जय पवारही उपस्थित!

Sunetra Pawar Praful Patel Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, पार्थ पवारांनी हे सर्व तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. त्यातच दिल्लीत सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर होत्या. या दौऱ्या दरम्यान प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यांनी आपल्या दौऱ्यापासून दूर ठेवल्याच्या चर्चा होत्या. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल यांच्या कार्याध्यक्षपदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा होती. दरम्यान, पार्थ पवार यांनी ट्विट करत या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते.

दरम्यान,गुरुवारी रात्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली. पटेल यांच्या निवास्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते.

पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रांच्या वादामुळे प्रफुल पटेल नाराज असल्याच्या चर्चा होती. अशातच पटेलांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सर्व अलबेल असल्याचे सांगितले जात आहे.

पार्थ पवार काय म्हणाले?

प्रफुल पटेल यांचे अधिकार कमी केल्याचे तसेच त्यांना कार्याध्यक्षपदावरून हटवल्याचे वृत्त काही वृत्तवाहिनींनी दिले होते. याबाबत पार्थ पवार यांनी ट्विट करत या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते.

त्यांनी सांगितले की, प्रफुलजी पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट करणारे वृत्त या निरधार, काल्पनिक आणि तथ्यहीन आहेत. अशा बनावट वादांमध्ये त्यांना ओढणे अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध झालाच पाहिजे. त्यांची अनेक दशकांची अविरत बांधिलकी आणि नेतृत्व आम्हा सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करत आले आहे.

जय पवारांवर पक्ष संघटनेत जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जय पवार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जय पवार हे पक्ष संघटनेत काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते राजकारणापासून दूर होते. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT