Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP News : सुनेत्रा पवारांच्या जागी 'राज्यसभेसाठी' 4 माजी खासदारांची फिल्डिंग : दोनदा माघार घेतलेल्या भुजबळांचे नाव पुन्हा आघाडीवर

NCP News : सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या खासदारासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. छगन भुजबळांसह अनेक नेते या जागेसाठी इच्छुक आहेत.

Hrishikesh Nalagune

DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर झाल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी राज्यसभेवर संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच सुरु आहे. येत्या काही दिवसांतच या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या खासदारकीची मुदत जुलै 2028 पर्यंत असणार आहे.

राज्यसभेसाठी माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले संजय पाटील यासाठी इच्छुक आहेत. यासोबतच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा स्पर्धेत आहेत. पक्षातील एका ज्येष्ठ युवा नेत्याचा अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्या नावासाठी आग्रह आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेले अनेक दिवस संसदेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी छगन भुजबळ नाशिक मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये नाशिकची जागा शिवसेनेला देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी फारच आग्रह धरल्याने अखेर भुजबळ यांनी माघार घेतली होती.

त्यानंतर राज्यसभा निवडणुकीवेळी ऐनवेळी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळीही भुजबळ यांना माघार घ्यावी लागली. आता मात्र छगन भुजबळ या जागेसाठी अडून बसले आहेत. खासदार होण्यासाठी मंत्रिपदावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी आहे. नाशिकमधील विधानसभेच्या जागेवर पुतणे समीर भुजबळ यांना पाठविण्याचे भुजबळ यांचे प्रयत्न असणार आहेत.

पक्षातील अन्य पदे कधी भरणार?

मागील काही दिवसांपासून पक्षातील रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत असा पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्षपद आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदही रिक्त आहे. ही पदेही लवकरात लवकर भरली जावीत अशी मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT