Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आमदार-खासदारांची आजच बैठक घेणार, नेमकं कारण काय?

NCP Meeting MLA MP : राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांच्या दृष्टिने कामाला लागली आहे. विधानसभेची तयारी आत्तापासून त्यांनी सुरू केली असून आज सुनेत्रा पवार या बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अ‍ॅक्शन मोडवर आहेत. त्या आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची बैठक घेणार आहेत. संध्याकाळ सहा वाजता ही बैठक होणार आहे. 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या बैठकीत पक्ष संघटना बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्या दृष्टिने देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. राजकारणात हा कालावधी फार मोठा मानला जात नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी पक्षाकडून सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची ही बैठक महत्त्वाची ठरेल, असे सांगितले जात आहे.

मंगळवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर प्रशांत किशोर यांची कंपनी राष्ट्रवादीची रणनीतीकार म्हणून काम करणार असल्याचे वृत्त होते. नरेश अरोरा यांच्यानंतर प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीची रणनीती ठरवणार असल्याचे सांगितले जात होते. त्यातून राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुर केली असल्याचे बोलले जात होते. मात्र, पार्थ पवार यांनी ट्विट करत प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या भेटीवर भाष्य केले.

पार्थ पवार यांनी ट्विट करत स्पष्ट केले की, प्रशांतजी हे मित्र असून भावासारखे आहेत. अजितदादांच्या काळापासून त्यांची आमच्याशी ओळख आहे. ते काल शहरात आले होते, त्यामुळे त्यांचे आमच्या घरी जेवणासाठी स्वागत करण्याचा आणि काही अर्थपूर्ण संवाद साधण्याचा आनंद आम्हाला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रशांत किशोर हे काम करणार असल्याचे वृत्ताचे पार्थ पवार यांनी खंडण केले आहे. ते म्हणाले,ते आमच्या सोबत काम करत असल्याच्या काही अटकळांबद्दल मी वस्तुस्थिती स्पष्ट करू इच्छितो की माझ्या माहितीनुसार त्यांनी राजकीय सल्लागार पद सोडून काही वर्षे झाली आहेत. त्यात बदल होईल असे मला वाटत नाही. पण जिथे गरज असेल तिथे आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध आहोत आणि राहू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT