

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही महिन्यांपूर्वी नरेश अरोरा यांना त्यांच्या रणनीतीकार पदावरुन हटवण्यात आलं होतं. आता ही नवी जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याविषयी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवे रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे जबाबदारी दिल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता यावर खासदार पार्थ पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत मंगळवारी (ता.19 मे) सकाळी प्रशांत किशोर यांची बैठक पार पडल्याचं समोर आलं होतं.याच बैठकीनंतर प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राजकीय रणनीतीकार आणि त्यांची कंपनी 1 जूनपासून पक्षाचं काम सुरू करणार असल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या होत्या. पण आता खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पार्थ पवार यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट एका ट्विटद्वारे दिली आहे.
पार्थ पवार ट्विटमध्ये म्हणतात, प्रशांतजी हे मित्र असून भावासारखे आहेत. दादांच्या काळापासून त्यांची आमच्याशी ओळख असल्याचं सांगितलं. ते काल शहरात आले होते, त्यामुळे त्यांचे आमच्या घरी जेवणासाठी स्वागत करण्याचा आणि काही अर्थपूर्ण संवाद साधण्याचा आनंद आम्हाला मिळाल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असल्याबाबत काही तर्क-वितर्क सुरू आहेत. त्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करू इच्छितो. माझ्या माहितीनुसार,त्यांनी काही वर्षांपूर्वीच राजकीय सल्लागार क्षेत्रातून स्वतःला दूर केले आहे. त्यात बदल होईल असे मला वाटत नसल्याचं पार्थ पवार ट्विटमध्ये म्हणतात.
मात्र,ज्यांना याबाबत उत्सुकता आहे, त्यांना मी एवढे नक्की सांगू शकतो की,गरज पडेल तिथे आम्ही एकमेकांसाठी कायम उपलब्ध राहू अशी भूमिका स्पष्ट करत प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना खासदार पार्थ पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय रणनीतीकार म्हणून काम पाहिले होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वीच अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार संपवला असल्यांचं स्पष्ट झालं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.