Sunil Tatkare News Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare News : महामंडळ वाटपाबाबत सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, 'इतर घटक पक्षांना...'

Political News : महामंडळावर फक्त शिंदे गटाच्या वाटेला आलेल्या पदाची घोषणा करण्यात आल्याने भाजप, राष्ट्रवादी, इतर घटक पक्षाची महामंडळावर वर्णी लागली नसल्याने नाराजी दिसत आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे बॅकफूटवर असलेल्या महायुतीने नाराज असलेल्या नेत्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याची वर्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महामंडळावर लावली आहे.

महामंडळावर फक्त शिंदे गटाच्या वाटेला आलेल्या पदाची घोषणा करण्यात आल्याने भाजप, राष्ट्रवादी, इतर घटक पक्षाची महामंडळावर वर्णी लागली नसल्याने नाराजी दिसत आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठे विधान केले आहे. (Sunil Tatkare News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महामंडळ वाटपाबाबत चर्चा झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी, इतर घटक पक्ष अशा सर्वांनाच महामंडळात सामावून घेतले पाहिजे. तशी चर्चा यापूर्वी झाली होती. या बाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

महिला मुख्यमंत्री वक्तव्याबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, ज्यांना दिवास्वप्न पाहायचं त्यांना पाहु द्या. येत्या काळात कोणी काहीही म्हणाले तर महायुतीचेच सरकार राज्यात येणार आहे. त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. नरहरी झिरवळ यांच्या बाबतीत कुणी जर पासींग रिमार्क म्हणून काही वक्तव्य केले असेल तर त्याबाबत गांभीर्यानं घेण्याची गरज नाही.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. जागावाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चर्चा पूर्ण झाले की लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

'वन नेशन, वन इलेक्शन' या केंद्र सरकारच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे. भारत सरकारकडून याबाबत कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. त्यासोबतच जय मालोकार मृत्यु प्रकरणाची व संबंधीत घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई केली जाईल, असेही यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT