Vasant Dhoble News : खाकी वर्दीला खादीचा मोह; माजी सहाय्यक पोलीस आयुक्त लढवणार विधानसभेची निवडणूक?

Political News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून बैठका घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
Vasant Dhoble
Vasant Dhoble Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून बैठका घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच राजकीय पक्षातील इच्छुकांसोबत आता खाकी वर्दीला देखील राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठी चुरस निर्माण होणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभेच्या रिंगणात काही पोलीस अधिकारी उतरणार आहेत. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांच्यानंतर आता माजी सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. (Vasant Dhoble News)

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरातील अनेक भागात माजी पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे ते विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. RAID स्पेशलिस्ट म्‍हणून ACP वसंत ढोबळे यांची ओळख आहे. गुंडापासून ते बॉलीवुड स्टार्स देखील दहशहतीत होते.

वसंत ढोबळे यांचे गणेशोत्सव काळात गोरेगावकरांकडून परिसरात लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. विधानसभेची निवडणूक (Vidhansabha election) ते लढवू शकतात, असे समजते. मात्र, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे येत्या काळात कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार की अपक्ष निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे.

Vasant Dhoble
Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा वाजवणार..

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संजय पांडे हे उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना लोकसभा निवडणूक लढू नये, यासाठी विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. मात्र, आता लवकरच राजकीय पक्षाची संघटना काढून ते विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते.

संजय पांडे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लवकरच राजकीय पक्ष संघटना काढण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे समजते. त्या माध्यमातून पांडे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत.

Vasant Dhoble
Sharad Pawar News: तुतारीतील इनकमिंग... अन् निवडणूक अंदाज..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com