Jaynat Patil, Sunil Tatkare, Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare News : जयंत पाटलांची टीका झोंबली; सुनील तटकरे म्हणाले, 'ज्यांच्या विचारांचा बेरंग झालाय...'

Sachin Waghmare

Mumbai News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. शेतकर्‍यांनी सरकारविरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडमधील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागितली. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता जयंत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्यांच्या विचारांचा बेरंग झाला आहे, त्यांच्याबद्दल फारस काही बोलण्याची आवश्यकता नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांनी ज्या काही क्रांतिकारी योजना दिल्या आहेत. त्यामुळे सत्तेची दिवा स्वप्न बघणाऱ्यांचा स्वप्नभंग आणि बेरंग झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची देशमूल्य वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत. या कडे फारस लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माजी मंत्री जयंत पाटील (Jaynat Patil) यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Sunil Tatkare News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे. यावरून देखील जयंत पाटलांनी खोचक टोला लगावला होता. जयंत पाटील म्हणाले होते की, आमची यात्रा ही साधी आहे. आमचा कोणताही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडत आहोत. त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर टीका केली होती. या टीकेला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री यांचे नाव गायब करण्यात आलेले नाही. आपण म्हणता ते चुकीचे आहे. योजना आहे तशीच आहे. आम्ही बोलत असताना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीचे आम्ही बोलत असतो.

तो काही फार मोठा चर्चेचा विषय नाही. महायुती म्हणून आम्ही सर्व या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला महायुती म्हणून जनतेचे पाठबळ नक्की मिळेल, असा विश्वासही यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनमानसात प्रतिमा किती मोठी आहे, हे आज महिला भगिनींच्या प्रतिसादाच्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अनुभवत आहोत. त्यामुळे येत्या काळात यात्रेला राज्यात मोठा पाठींबा मिळेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT