CJI Bhushan Gavai Sarkarnama
महाराष्ट्र

CJI Bhushan Gavai : वागणूक काढताच सुजाता सौनिक, रश्मी शुक्ला थेट चैत्यभूमीवर; सरन्यायाधीश गवईंशी चर्चेचा Video समोर

Chief Secretary Sujata Saunik, DGP Rashmi Shukla : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 14 मे रोजी पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते पहिल्यांदाच सरन्यायाधीश म्हणून रविवारी मुंबईत आले होते.

Rajanand More

Maharashtra News : प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर ते रविवारी ते पहिल्यांदाच मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी राज्यातील एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांची वागणूक काढताच त्यांना खडबडून जाग आल्याचे पाहायला मिळाले.

सत्काराच्या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश गवई हे दादर येथील चैत्यभूमीवर गेले. यावेळी मात्र त्यांच्यासोबत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. यावेळी चैत्यभूमीवर हे तिन्ही अधिकारी खुर्चीवर बसलेल्या सरन्यायाधीशांसोबत उभे राहून बोलताना दिसले. हे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे.

तिन्ही अधिकारी सरन्यायाधीशांची नाराजी दूर करत आहेत, असे या अधिकाऱ्यांच्या देहबोलीवरून दिसत आहे. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी 14 मे रोजी पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते पहिल्यांदाच सरन्यायाधीश म्हणून रविवारी मुंबईत आले होते. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.

सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. लोकशाहीचे तीन स्तंभ समान आहेत, असे आपण मानतो. महाराष्ट्रातील एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना किंवा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना किंवा मुंबई पोलिस आयुक्तांना तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार करावा, अशी नाराजी सरन्यायाधीशांनी उघडपणे व्यक्त केली.  

राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळी पहिल्यांदा या राज्यात येत असेल आणि तोही त्याच राज्याचा... त्यांनी दिलेली ही वागणूक योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टींमध्ये मला वेळ नाही, अशी भावना सरन्यायाधीशांना व्यक्त केली. या लहानसहान गोष्टी आहेत, पण मी उल्लेख यासाठी केला की लोकांना कळले पाहिजे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT