BJP New President : कोण होणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? शर्यतीत उरली ही दोनच नावं...

Only two names remain in the race for BJP's next national president : पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष संपुष्टात येत असल्याने, भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारीचीही या महिन्याच्या अखेरीस घोषणा केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Narendra Modi Amit Shah j p Nadda .jpg
Narendra Modi Amit Shah j p Nadda .jpgSarkarnama
Published on
Updated on

BJP New President : पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष संपुष्टात येत असल्याने, भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यासोबतच, जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारीचीही या महिन्याच्या अखेरीस घोषणा केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पुढे ढकलली होती. परंतु ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीनंतर पक्ष लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारीचे नाव जाहीर करू शकतो.

Narendra Modi Amit Shah j p Nadda .jpg
Chhagan Bhujbal : 'PMLA कायद्याचा पहिला बळी मीच', माझी अडीच वर्ष तुरुंगात गेली ; भुजबळांची खंत...

जे.पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला तरी पक्षाला नवा अध्यक्ष सापडलेला नाही. सध्या जे.पी. नड्डा यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचा प्रभार आहे. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून आतापर्यंत डझनभराहून अधिक नावे चर्चेत आहेत. यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनेक मोठे चेहरे समाविष्ट आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावांचा गांभीर्याने विचार केला जात आहे.

आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केवळ ही दोनच प्रमुख नावं उरली आहेत असं सांगितलं जात आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्व समोर आणून सामाजिक संतुलन प्रस्थापित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव हे ओबीसी समुदायातील असून दीर्घकाळापासून पक्षसंघटनेमध्ये सक्रिय आहेत. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत ओदिशामध्ये मिळवलेल्या विजयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. मात्र ते केंद्रात मंत्रिपदावर कायम राहिले.

Narendra Modi Amit Shah j p Nadda .jpg
Eknath Shinde : सदस्य नोंदणीचे दीड लाखांचे टार्गेट, पूर्ण करता-करता शिंदे गटाचे नाकीनऊ

भूपेंद्र यादव व धर्मेंद्र प्रधान या दोघांनीही याआधी विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे. परंतु मात्र अनुभव आणि संघटनेवरील प्रभावाचा विचार करता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये प्रस्तावित बिहार विधानसभा निवडणुकांची रणनीती नव्या नेतृत्वाच्या अधिपत्याखाली आखता येणार आहे. मात्र हे सगळे अंदाज असून अधिकृत माहिती आजून समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com