New Dehli news : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत गुरुवारी दुपारी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. चिन्ह हे पक्षासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी चिन्हावर दावा केला. त्यासोबतच सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद असताना नवा प्रतोद का नेमण्यात आला, अशी विचारणाही केली.
त्यासोबतच निवडणूक आयोगाने अनेक बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली घटना निवडणूक आयोगाने उघडून बघितली देखील नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी यावेळी केला. यावेळी सिब्बल यांनी कोर्टासमोर सर्व घटनाक्रम मांडला. त्यानंतर या युक्तिवादावर टिपण्णी करताना कोर्टाने सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यासोबतच आता सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत मंगळवारी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीनंतर कोर्टावर आमचा विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या चार वर्षांपासून याचिका प्रलंबित
शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर 30 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना चिन्ह प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाने मोठे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ४ ऑगस्टला होत असलेल्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.