Supreme Court hearing Maharashtra politics Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : आम्ही जो निर्णय देऊ तो... : शिवसेनेच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान; राष्ट्रवादीची धाकधूक वाढली

Shiv Sena Supreme Court hearing latest news: या संपूर्ण कायदेशीर संघर्षावर आणि आमदारांच्या अपात्रतेसह पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर आता पुढील आठवड्यात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

Sachin Waghmare

Shiv Sena Symbol Case: सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद करीत धारेवर धरले.

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचे विधान केले आहे. "आम्ही या प्रकरणी जो निर्णय देऊ, तो केवळ आजच्यापुरता मर्यादित नसेल तर देशाच्या भविष्यातील राजकारणासाठी लागू होईल," असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल देशातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

या संपूर्ण कायदेशीर संघर्षावर आणि आमदारांच्या अपात्रतेसह पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर आता पुढील आठवड्यात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. यावेळी कपिल सिब्बल म्हणाले, अपात्रतेचा प्रश्न निकाली निघण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कोणता गट हा मूळ राजकीय पक्ष आहे, याचा निर्णय दिला, तर नेमकी हीच समस्या निर्माण होते. एकदा आयोगाने एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देऊन त्याला पक्षाचे निवडणूक चिन्ह बहाल केले, तर त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला तरी त्याचा काहीच उपयोग राहत नाही; तोपर्यंत “घोडा तबेल्यातून निघून गेलेला असतो.”

गुरुवारच्या युक्तिवादात सिब्बल यांनी थेट निवडणुक आयोगालाच धारेवर धरलं आहे. निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिले असा युक्तिवाद केला आहे.

निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ ला एकनाथ शिंदे यांना पक्ष व चिन्ह देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर विधिमंडळ पक्षच राजकीय पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निष्कर्ष काढून हा निर्णय दिला आहे. त्यामुळे तुम्ही आधी निवडणूक आयोगाचा मुद्दा घ्या, अपातत्रेचा नको, असा युक्तिवाद यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रिम कोर्टात केला.

यावर कोर्टाने स्पष्ट केले की, सुरुवातीला अपातत्रेबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर चिन्हाबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करतानाच 'आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल' असे महत्त्वाचे विधान सुप्रीम कोर्टाने केले आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धाकधूक वाढली आहे. आता या प्रकरणी कोर्टात पुढील आठवड्यात मंगळवारी अथवा बुधवारी सुनावणी होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT