Supriya Sule Sarkarnama
महाराष्ट्र

Supriya Sule : जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहाराची तपासणी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jain Boarding Land Deal Supriya Sule devendra fadnavis : जैन बोर्डिंगच्या जागा खरेदी व्यवहाराच्या तपासणी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Roshan More

Supriya Sule News : SHND जैन बोर्डिंगची जागा खरेदी व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. जैन समुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांना तातडीने सुनावणी घ्यायला सांगावे तसेच व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी, हीच सर्व जैन बांधवांची एकमुखी मागणी आहे. ती मान्य करावी असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पुण्यामध्ये सन 1958 मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत SHND जैन बोर्डिंगची जागा खरेदी केली. त्या खरेदी खतामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ही जागा ज्या उद्देशाने घेण्यात आली - म्हणजेच शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी - त्याच उद्देशासाठी कायमस्वरूपी वापरली जावी. मात्र, आज या जागेची विक्री करून त्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करण्यात येत आहे, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.

'माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांच्या समोर या संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असताना एवढ्या घाईघाईने या जागेच्या विक्रीचा निर्णय घेण्यात का आला, हा प्रश्न समाजाला पडला आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्रीबाबत तरतूद केलेली नाही. तरीसुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली, यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवे.', अशी देखील त्यांनी मागणी केली.

'ट्रस्टकडे हॉस्टेल दुरुस्तीकरिता निधी नसल्याचे कारण देण्यात आले, पण मागील दोन वर्षांत ट्रस्टचे तब्बल चौदा कोटी रुपये अन्य कंपनीकडे वळवण्यात आले, ही बाब अधिकच संशयास्पद आहे. 1960 पासून या परिसरात असलेले भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आज धोक्यात आले आहे. मंदिराला तातडीने पोलिस सुरक्षा देण्यात यावी.', अशी सर्वांची मागणी असल्याचे देखील सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT