Murlidhar Mohol : बिळात बसलेला उंदीर बाहेर आला अन्..! जमीन प्रकरणावर मोहोळांचा मोठा खुलासा, धंगेकरांच्या ‘बॉम्ब’ची वात विझवली... 

राजू शेट्टी यांनी या व्यवहाराबाबत माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांना सर्व सत्य मी समजावून सांगितलं असतं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले नसते, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar, Murlidhar MoholSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. कोथरूडमधील गुन्हेगारी आणि गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी घणाघाती टीका केली. नंतर आता एका जमीन व्यवहाराच्या आरोपावरून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. त्याला पुण्याचे खासदार असलेल्या मोहोळांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी जमीन प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनी संदर्भात माझ्यावर जे आरोप होत आहेत. त्या संदर्भात मी खुलासा करत आहे. राजू शेट्टी यांनी माझ्यावर आरोप केले अथवा पुण्यातील कोणी एक नेता माझ्यावर बोलत आहे म्हणून नव्हे आरोपांमुळे कुठेतरी पुणेकरांमध्ये माझ्या बाबत शंका आली असेल. ती शंका दूर करण्यासाठी यातील सत्य काय आहे, ते सांगणार आहे.

राजू शेट्टी यांनी या व्यवहाराबाबत माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांना सर्व सत्य मी समजावून सांगितलं असतं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले नसते. मात्र माझ्यासोबत कोणतीही चर्चा न करता त्यांनी आरोप केले आहेत. मात्र या प्रकरणांमध्ये ज्या गोखले कंट्रक्शन कंपनीने व्यवहार केला आहे, त्या कंपनीमधून मी 25 नोव्हेंबर 2024 सालीच बाहेर पडलो आहे. हा व्यवहार झाला त्यापूर्वी एक महिना मी या कंपनीतनं बाहेर पडलो आहे. या कंपनीसोबत असताना देखील कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Ajit Pawar vs Murlidhar Mohol : अजितदादांसमोर मुरलीअण्णांची माघार नाहीच, आत्ता फैसाल निवडणुकीच्या मैदानात!

धंगेकर यांच्यावर टीका करताना मोहोळ म्हणाले, पुण्यातील जैन बांधवांनी माझ्यावर आरोप केला नाही. मात्र राजू शेट्टी यांनी माझ्यावर आरोप केल्यानंतर बिळात बसलेला उंदीर बाहेर आला आणि माझ्यावर बोलू लागला, असं म्हणत मोहोळ यांनी धंगेकारांवर टीका केली. ते पुढे म्हणाले, कोणताही आरोप करताना त्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे. आरोपांमुळे एखाद्याचं राजकीय करियर उध्वस्त होवू शकतं. याबाबतची सगळी अधिकृत कागदपत्रं मी दिली असून जर मी चुकीचा असेल तर मला देखील सोडू नका, असं मोहोळ म्हणाले.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Cyber Fraud in Pune : कोथरूडमधील वयस्कर व्यक्तीने क्षणात दीड कोटी गमावले, सायबर गुन्हेगाराने NIA अधिकारी असल्याचं सांगितलं अन् जाळ्यात अडकले

धंगेकर यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, मी या माणसावर एक ही शब्द बोलणार नाही. ते वैफल्यग्रस्त आहेतं सगळीकडून नाकारले गेले आहेत. अधिक काही बोलायचं असेल तर त्यावर आमचे स्थानिक प्रसिद्धी प्रमुख बोलतील, असे सांगत मोहोळ यांनी धंगेकरांवर अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.