Supriya Sule meets PM Narendra Modi in Delhi: खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. मुलगी रेवतीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत मुलगी रेवती, जावई सारंग लखानी, अरुण लखानी आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , प्रियांका गांधी यांची भेट घेत लग्नाचे निमंत्रण दिले.
मीडिया रिपोर्टनुसार मुंबईमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. रेवती सुळे या उच्चशिक्षित असून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत रेवती सुळे या सहभागी झाल्याचे दिसून आले.
सुप्रिया सुळेंचे जावई आणि रेवती सुळेंचे होणारे पती सारंग अरुण लखानी हे उद्योजक घराण्यातील आहेत. उद्योजक विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग हे उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.