Supriya Sule Sarkarnama
महाराष्ट्र

Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र, विजय वडेट्टीवारांच्या 'त्या' दाव्यातील हवाच काढली, स्वतःच सांगितलं खरं काय?

Supriya Sule OBC Certificate Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला स्वतः खासदार सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Roshan More

Supriya Sule News : काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील सर्वच बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे ते म्हणाले. तसेच शरद पवारसाहेबांकडे आहे की नाही मला माहीत नाही. मी त्यावर काही बोलू शकत नाही, असे देखील सांगितले.

वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडत वडेट्टीवारांचा दावा खोडून काढला आहे.

त्या म्हणाल्या, 'मला धक्का बसलाय हे सगळं ऐकुण. माझ्याकडे माझं बर्थ सर्टिफिकेट, माझ्या काॅलेजच्या डिग्रीच सर्टिफिकेट, त्याच्यानंतर माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट, आणि बारामती लोकसभेची लोकप्रतिनीधी म्हणून खासदारकीच सर्टिफिकेट आहे. एवढी सगळी सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. आता हे कुठंल सर्टिफिकेट माझ्या नावाने लावतायत याचं उत्तर काँग्रेस पक्षालाच द्यावं लागेल. मला आश्चर्य वाटतंय की रोज उठून महाराष्ट्र काँग्रेसमधील लोक मला टार्गेट का करतायेत?'

आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट शब्दात नाकारत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ' माझ्याकडं असं प्रमाणपत्र नाही, हे तुम्हाला सांगू शकते. मला दुख आणि वेदना होतायेत की महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मला टार्गेट का करतंय? मी तर काँग्रेसच्या विरोधात कधी काही बोलत नाही. पार्लमेंटमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त सुप्रिया सुळे डिफेंड करते. आमचे आठही खासदार ताकदीने काँग्रेसबरोबर राहिले आहेत. एक दोन नव्हे गेली १२ वर्ष.'

प्रमाणपत्र काँग्रेसने दाखवून द्यावा

असे खोटे आरोप करून काँग्रेस मला का टार्गेट करतंय, हे खुपच दुर्देवी आहे, असे देखील त्या म्हणाल्या. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, हे काँग्रेस पक्षाला कोणी सांगितलं याचं उत्तर काँग्रेस पक्षाने द्यावे. काँग्रेस पक्षाने ते सर्टिफिकेट दाखवावं. मला खर्गेजी, राहुलजी, वेणुगोपालजी यांच्याशी बोलावे लागेल, असे देखील त्या साम टिव्हीशी बोलताना म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT