Supriya Sule : 'राज्यातील काँग्रेसचा आमच्यावर राग', सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं,' आम्ही देशात सोबतच...'

Ncp sharad pawar Prithviraj Chavan : सुप्रिया सुळे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर काय राग आहे मला माहीत नाही?
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाण्याची भीती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. शरद पवार हे विचारांनी डावीकडे झुकलेले नेते आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी मनुस्मृती माननाऱ्या लोकांबरोबर जाऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील काँग्रेसच काय मला माहीत नाही. देशाच्या काँग्रेस सोबत मी नेहमी चर्चा करते.पॉलिसी लेव्हलला आम्ही देशात काँग्रेस सोबतच आहोत.

'महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर काय राग आहे मला माहीत नाही? राज्यातील काँग्रेस नाराज का आहे हे त्यांनाच माहीत. संसदेत मतदान झाले त्यावेळी आमचे खासदार काँग्रेस सोबतच होते. काँग्रेसमधील काही लोकांशी आम्ही नेहमी चर्चा करतो, जे नाराज असतील त्या बद्दल त्यांच्या वरिष्ठांना माहिती असेल.', असे देखील त्यांनी सांगितले.

पुण्याच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, पुण्याची वेगळी ओळख आहे. मात्र देशात क्राईममध्ये 5 नंबरला गेले आहे.अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाचा हा रिपोर्ट आहे.पुण्याची गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.या पुण्याची आणि पर्यायाने महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील गुहेगरीची आकडेवारी भारत सरकारने दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी काही विषयात राजकारण बाजूला ठेऊन पुढे जाऊया. बाकीच्या राज्यात गुंतवणूक वाढत आहे.महाराष्ट्र मध्ये अस का होत नाही. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Supriya Sule
Shivsena Hearing : 'शिवसेना ठाकरेंचीच...'; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर CM फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले "2024 चा कौल पाहता न्यायालय तसाच निर्णय..."

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरून त्यांच्यावर भाजपमधील नेते टीका करते होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांची गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे. त्यांना राहुल गांधी पुण्यात आले याच वाईट का वाटावं? गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असणाऱ्यांना रस्त्यावर उतरून मारामाऱ्या कराव्या लागतात, हे धक्कादायक आहे.

परीक्षाचा तणाव नवीन पिढीवर आहे.तंत्रज्ञान येऊन सुधा डेटा लिक कसा होतात. आयएएसचे पेपर कसे लीक होत नाहीत? दाल मे कुछ तो काला है. ही परीक्षेची प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत असतील तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे.राहुल गांधी नव्या पिढीशी चर्चा करत असतील तर त्यांचं स्वागतचं केल पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पुणे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले होते. यावर काँग्रेसची नाराजी आहे. याचमुळे पुण्यात हर्षवर्धन सपकाळ आले होते तेव्हा त्यांच्यासमोर काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भुमिकांमुळे आपल्याला फटका बसतोय अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली होती.

Supriya Sule
Supriya Sule: काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, मला अन् शरद पवारांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com