Suresh Dhas claims Jalindar Supekar demanded ₹300 crore from jail, creating political uproar. sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas On Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात सुरेश धसांची एंट्री! जालिंदर सुपेकरने तुरुंगात 300 कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट

Vaishnavi Hagwane case Jalindar Supekar : अरे 150 कोटी प्राॅपर्टी तिला जाळायचे का? आता ती कोण खाणारे आणि हे बाहेर आले तरी त्यांना शेणच हाणणार आहेत लोक, असा टोला धस यांनी हगवणे कुटंबीयांना लगावला.

Roshan More

Suresh Dhas News : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या कारागृह उप महानिरीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य सरकारने काढून घेत दणका दिला होता. त्यांची बदली करण्यात आली होती. आता भाजप आमदार सुरेश धसांची या प्रकरणात एंट्री झाली असून त्यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.

सुरेश धस म्हणाले, ' हगवणे यांचा नातेवाईक सुपेकर आयजी पोस्टवर आहे. तो एक लाख रुपये चेकद्वारे घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल सप्रेम भेट घेतो, या पेक्षा दुर्देव काय आहे. सुपेकरच्या बऱ्याचश्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. जेलमध्ये 300 कोटी रुपये त्यानी मागितल्याची एक गंभीर तक्रार माझ्याकडे आली आहे.'

'ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता याचा अर्थ तुम्ही शंभर टक्के फाॅल्टी आहात. आयजी पोस्टवरील सुपेकरसुद्धा मला फाॅल्टी दिसतोय. त्याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट काही राहिलेली दिसत नाही. नैतिकता खाली ढासळत चालल्याची हे उदाहरण आहे.', असे देखील धस म्हणाले.

'अरे 150 कोटी प्राॅपर्टी तिला जाळायचे का? आता ती कोण खाणारे आणि हे बाहेर आले तरी त्यांना शेणच हाणणार आहेत लोक.असे लोक कितीही वर्षांनी बाहेर येवोत समाजाने शेण आणि रंदा सोबतच ठेवायला पाहिजे. असे लोक बहिष्कृत करायला पाहिजे.', असा हल्लाबोल हगवणे कुटुंबियांवर धस यांनी केला.

टमाटे नको कवटं हाणा...

सुरेश धस म्हणाले, उद्धव ठाकरेसाहेबांच्य पक्षातील महिला कार्यकर्त्यांना हगवणेच्या घरावर शेण फेकले. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना टमाटर मारले. मी म्हणतो टमाटर नाही यांना कवटं फेकून हाणली पाहिजेत.

सुपकरे कराड कनेक्शन?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात ठेवण्यामागे जालिंदर सुपेकर असल्याचा आरोप केला आहे. सुपेकरकडून प्रत्येक जेलमधून पैसै घेत असल्याची माहिती आहे. त्याने आणि अमित गुप्ता यांनीही बंदुक लायसन्समध्ये पैसे कमवले असल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT