Suresh Dhas Dhananjay Munde sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas Video : सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, 'मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणार नाही...'

Suresh Dhas Dhananjay Munde Crop Insurance Fraud : छोटा आका आणि मोठा आका म्हणत टीका करणाऱ्या सुरेश धस यांनी मोठा आका म्हणत थेट धनंजय मुंडेंचे नाव घेतले.

Roshan More

Suresh Dhas News : आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणानंतर छोटा, मोठा आका म्हणत वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. सुरेस धस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुंडे कृषीमंत्री असताना पीकविम्यामध्ये कोट्यावधीचा खोटाळा झाल्याचा आरोप केला.

'साम टिव्ही'शी बोलताना सुरेश धस यांनी पीकविम्यात कोट्यावधीचा खोटाळा झाल्याचे सांगताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणार नसल्याचे स्पष्ट केले.

सुरेश धस म्हणाले, मी राजीनाम्याची मागणी करणार नाही. राजीनाम्याची मागणी करून ते देणार आहेत का? लालबाहदूर शास्त्री कोणी राहिले आहे का या देशात आत्ता? त्यांची इन्व्हाॅलमेंट दिसली तर मी राजीनाम्याची मागणी करणार.

छोटा आका आणि मोठा आका म्हणत टीका करणाऱ्या सुरेश धस यांनी मोठा आका म्हणत थेट धनंजय मुंडेंचे नाव घेतले. वाल्मिक कराड यांच्यात आणि इन्शुरन्सवाले बाळासाहेब इनकर यांच्यात शा‍ब्दिक वाद झाले. मात्र, नंतर छोट्या आका आणि मोठ्या आकाबरोबर त्यांच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकांची चौकशी करावी. तब्बल 1000 हजार कोटीचा पीकविमा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी 2020 पर्यंत मागे जावे लागेल, असे धस म्हणाले

धनंजय मुंडेंनी पालकमंत्रिपद भाड्याने दिलं

महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे हे मंत्री झाले त्यांना बीडचे पालकमंत्री पद मिळाले. पण त्यांना वेळ नव्हता की काय माहित नाही. पण सगळा कारभार वाल्मिक कराडच्या हातात गेला. मुंडेंसोबस त्यांच्यात काय बोलणं होतं माहित नाही. साधा नगराध्यक्षपदावर गेलेल्या व्यक्तीच्या हातात मुंडेंनी हे सगळे सोपवलं. मग त्यांनी हम करे को कायदा असे ते वागले. पुन्हा महायुतीचे सरकारमध्ये देखील धनंजय मुंडे आले. त्यांना पुन्हा बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आले. धनंजय मुंडेंनी मंत्रिपद, पालकमंत्रिपद वाल्मिक कराडकडे भाड्याने दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT