Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानं राष्ट्रवादी,शिवसेनेचं टेन्शन वाढलं

Chandrashekhar Bawankule statement on Municipal Election: नागपूर शहरात भाजपचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत १५० पैकी तब्बल १०८ भाजपचे नगरसेवक निवडूण आले होते. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडूण आले होते.
 Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीत युती एकत्र राहणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.

अलीकडेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती करायची की नाही याचा निर्णय जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांना घ्यायचा असल्याचे सांगितले. त्यांच्या निर्णयात प्रदेश भाजप हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अडीच वर्षांपासून महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 Chandrashekhar Bawankule
Cabinet Meeting : ...आता शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होणार भाजप आमदाराच्या बँकेतून? मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला निर्णय

नागपूर शहरात भाजपचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत १५० पैकी तब्बल १०८ भाजपचे नगरसेवक निवडूण आले होते. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडूण आले होते. यात उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा समावेश आहे. पेठे यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती. ते पराभूत झाले आहेत.

किशोर कुमेरिया हेसुद्धा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा काँग्रेसकडे गेली. त्यामुळे कुमेरिया यांचा नाईलाज झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले असल्याने अजित पवार आणि शिंदे सेनेचा एकही नगरसेवक नाही. महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन राष्ट्रवादी व शिवसेनेला शहरात खाते उघडायचे आहे.चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने दोन्ही पक्षांना भाजपच्या मदतीची गरज भासणार आहे.

भाजपकडे आधीच इच्छुकांची भरमार आहे. १५० जागांसाठी सुमारे सहाशे इच्छुक आहेत. संपूर्ण शहरात कार्यकर्त्यांची फळी आणि नेटवर्क आहे. शहरात आपले राजकीय वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे पदाधिकारी एक महायुती करण्याच्या मनःस्थितीत नाही. आम्‍हालाच कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी जागा कमी पडत आहेत. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनाला जागा सोडायच्या कुठून असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे बघता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेला महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी लागणार आहे. विशेष म्हणजे शिंदे व ठाकरे सेना आणि अजित पवार व शरद पवार गटाला महापालिकेच्या दीडशे जागा लढाण्यासाठी उमेदवारसुद्धा शोधावे लागू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com