Sushilabai shivajirao patil nilangekar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sushila devi Patil : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलादेवी यांचे निधन

Sushila Devi Patil death महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलादेवी निलंगेकर यांचे काल रात्री दहाच्या सुमारास निधन झाले.

Rashmi Mane

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून त्या आजारी होत्या. लातूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव निलंगा येथील घरी ठेवण्यात आले असून आज दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता निलंगा येथील सिंदखेड रोडवरील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निलंगा येथील शिंदखेड रोडवर असणाऱ्या निलंगेकर यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत.

17 फेब्रुवारीला सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.शरदराव पाटील,अशोकराव पाटील,विजय पाटील,डॉ.सौ.चंद्रकला डावले.स्व.दिलीपराव पाटील यांचे सुपूत्र माजी मंत्री संभाजीराव पाटील,अरविंद पाटील,नातू,पणतू,स्नुषा,नात सुना असा परिवार आहे..

सुशीलादेवी यांचा विवाह १९५१ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत झाला. सुशीलादेवी यांनी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली. त्यामुळे निलंगेकर यांच्या आयुष्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या रूपाने निलंगेकर कुटुंबियांचा आधारवड कोसळला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या त्या मातुश्री आहेत. तर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT