Chandrashekhar Bawankule: जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचा बावनकुळेंनी विषयच संपवला; म्हणाले...

Jayant Patil not joining BJP: भाजप प्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये येणार अशी अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सातत्याने सत्ताधारी नेत्यांकडून याबाबत संकेत देण्याचे काम सुरू आहे. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच आता हा विषय संपवला आहे.

भाजप प्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये येणार अशी अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले. ते कोल्हापुरात बोलत होते.

जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार नाहीत. त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क नाही, असेही चंद्रशेखर वावनकुळे म्हणाले. राज्यात गेल्या महिनाभरापासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर दोघांनीही एकमेकांची भेट घेतली.

Chandrasekhar Bawankule
Maharashtra Politics live : 'लाडकी'कडून सदस्य फॉर्म भरून घेणं चुकीचे ; शिरसाटांचा भाजपवर निशाणा

त्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना आजारी असल्याने भेटले. त्यांचा कोणताही दुसरा हेतू नाही. धस हे प्रामाणिक कार्यकर्तें आहेत. एकादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात. धस आणि मुंडे या दोघांनीही सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महायुती मधील सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात कामाला लागले आहेत. रखडलेले दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तो विषय अंतिम टप्प्यात आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही. या योजनेतून आर्थिकदृष्या सक्षम असणान्या महिलानी स्वत-हून बाजूला व्हावे, असे आवाहन केले आहे. योजनेतून बाहेर जाणायांवर कोणावरही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com