Sushma Andhare Sanjay Shirsat Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : भाजप, शिंदेंच्या शिलेदरांचे 'कॅश कांड', तारखेसह सुषमा अंधारेंनी इतिहास काढला; 'खोक्या'ची जात सांगून टोला लगावला

Sushma Andhare ON Sanjay Shirsat Cash Scandal Allegations : सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंच्या आणि भाजप नेत्यांकडे कधी कधी कॅश सापडली यांची माहिती आपल्या पोस्टमध्ये तारीख आणि वर्षासह शेअर केली आहे.

Roshan More

Sushma Andhare News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे बसले आहेत. त्यांच्या बॅगेत पैसे असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तो व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटकडे कॅश आढळून आली ही काही पहिली घटना नाही, असे म्हणत शिरसाट यांच्यासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडे तसेच भाजप नेत्यांकडे कधीकधी पैसे सापडले याचा तारखेसह इतिहास सांगितला. त्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

'संजय शिरसाटचा भल्या मोठ्या कॅशसह व्हिडिओ व्हायरल झाला. यावर स्पष्टीकरण देताना शिरसाटने माझचं घर आहे. माझीच बॅग आहे आणि व्हिडिओ माझ्या जवळच्या माणसाने काढलाय पण कोणी काढलाय हे माहीत नाही असे म्हटले. एवढा पैसा कमावणाऱ्या माणसाला एक विश्वासू माणूस कमावता येत नसेल तर त्याचे जगणे व्यर्थ आहे.', असा टोला लगावत हा फारच तात्विक मुद्दा आहे असे अंधारे यांनी म्हटले.

कॅश कांडचा इतिहास...

अंधारे यांनी शिंदेंच्या आणि भाजप नेत्यांकडे कधी कधी कॅश सापडली यांची माहिती आपल्या पोस्टमध्ये तारीख आणि वर्षासह शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,

- 20 नोव्हेंबर 2023 ला भाजपाचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमध्ये कसीनोमध्ये पैशांची लय लूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

- 22 ऑक्टोबर 2024 ला पुण्याजवळच्या शिरवळ येथील टोल नाक्यावर शहाजी बापू पाटील यांच्या निकटवर्तीयाच्या गाडीमध्ये पाच कोटीची रक्कम सापडली.

- 19 नोव्हेंबर 2024 ला विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ बहुजन विकास आघाडीने प्रकाशित केला.

– 28 मे 2025 ला अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्यामध्ये साडेपाच कोटींची कॅश सापडली.

– नाशिक येथे शिक्षक मतदार संघाचे एकनाथ शिंदेंचे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून कॅश आणि इतर वस्तू वाटप करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले.

खोक्यावर बुलडोझर कारवाई...

अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, याच पद्धतीने छोट्या-मोठ्या रक्कमांसह एसंशीचे आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते यांचे व्हिडिओ व्हायरल झाले.पण या सगळ्यांमध्ये समान धागा एक आहे की यातल्या एकाही माणसावर कुठल्याही प्रकारची केस झाली नाही. कारवाई केली नाही. किंवा यांची कसलीही चौकशी झाली नाही! यांच्यापैकी कुणाच्याही घरावर बुलडोझर चालवला गेला नाही. मात्र आष्टी मध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले या पारधी समाजाच्या कार्यकर्त्याची पाच दहा लाख रुपये फार फार तर गाडीमध्ये ठेवून केलेला रील व्हायरल झाला आणि खोक्या भोसले वर कारवाई झाली

खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर चालून त्याच्या संपूर्ण नातेवाईकांना रस्त्यावर आणले. खोक्या भोसले हा भटक्या विमुक्तातील पारधी समाजातला आहे तूर्तास इतकेच. बाय द वे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या सात पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते त्याची मुदत संपलेली आहे मात्र पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नाहीत.सोमनाथ सूर्यवंशी हा भटक्या विमुक्तातील वडार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT