Ujjwal Nikam : मोठी बातमी! अ‍ॅड. उज्वल निकम यांची खासदारपदी निवड, मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला यांनाही संधी

Ujjwal Nikam MP : लोकसभा निवडणुकीत उज्वल निकम यांना काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
Ujjwal Nikam
Ujjwal Nikamsarkarnama
Published on
Updated on

Ujjwal Nikam News : ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची खासदारपदी निवड झाली आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या, 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, कोपर्डी बलात्कार या हायप्रोफाईल केसमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सरकारी विशेष सरकरी वकील म्हणून ते काम पाहत आहेत.

चार जणांना खासदारपदी निवड

उज्वल निकम यांच्यासोबत हर्षवर्धन श्रृंगला , डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंदन मास्टर यांची देखील राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन श्रृंगला हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. तर, सदानंद मास्टर हे केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर, मीनाझी जैन हा प्रसिद्ध इतिहासकार आहेत.

Ujjwal Nikam
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी भ्रष्ट नेत्यांच्या नेक्स्ट जनरेशनची केली कोंडी, नेमकं प्रकरण काय?

उज्वल निकम यांच्या घरात काँग्रेसचा वारसा

लोकसभा निवडणूक भाजपकडून लढलेल्या ॲड.निकम यांचे मूळ कॉंग्रेसचे घराणे आहे. त्यांचे वडील बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा तालुक्यातून कॉंग्रेसचे आमदार होते. तसेच त्यांचे भाऊ दिलीप निकम व भावजय शैलजा निकम या कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. दरम्यान, उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले.

Ujjwal Nikam
Nitin Gadkari : शालार्थ आणि शिक्षक भरती घोटाळा, नितीन गडकरींचा संताप; सरकारला घरचा आहेर देत म्हणाले, "कोण अक्कल सांगणार?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com