Sushma Andhare lashes out at Raj Thackeray and Devendra Fadnavis meet, terms it ‘politics of division’. sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray-Fadnavis Meet : राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'फोडाफोडीचं राजकारण...'

Sushma Andhare Shivsena UBT MNS : सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना टार्गेट करताना म्हटले, 'कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील. त्यातल्या तात फडणवीस हे फोडाफोडीच्या राजकारणात अग्रेसर आहेत.

Roshan More

Sushma Andhare ON Thackeray-Fadnavis Meet : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चा सुरू असताना अचानक आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुंबईतील एका हाॅटेलमध्ये ही भेट झाली. तब्बल दीड तास राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली. मात्र या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर येऊ शकला नाही. आता या भेटीबाबत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे राज ठाकरेंचे नाव न घेता म्हणाल्या, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या सातत्याने अपमान केला त्यांच्यासोबत आपण जायचं का? निवडणुकीच्या आधी घेतलेल्या भूमिका आणि निवडणुकीनंतर घेतलेल्या भूमिका याच्यामध्ये आपल्यामध्ये एकसुत्रता नसते. सुसुत्रता नसते.'

अंधारे यांनी फडणवीसांना टार्गेट करताना म्हटले, 'कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील. त्यातल्या तात फडणवीस हे फोडाफोडीच्या राजकारणात अग्रेसर आहेत. घराण्यांची फोडाफोडी, नातेसंबंधांची फोडाफोडी करणं हे फडणवीसांसाठी बायेहात का खेल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला वेगळी अपेक्षा नाही.'

देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत. फक्त महाराष्ट्राची तोडफोड होऊ द्यायची का? महाराष्ट्राची हित धोक्यात आणायचे का? याचा विचार करा, असे नाव न घेता राज ठाकरेंना अंधारे यांनी आवाहन केले.

काँग्रेसची फडणवीसांवर टीका

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस-ठाकरे भेटीवरून टीका केली. ते म्हणाले, 'भाजप हा 24 तास राजकारण करणारी पार्टी आहे. सत्तेवर कसे यावे? दुसर्‍याच्या घरी आग कशी लावावी? घरे कशी तोडावीत यात ते एक्सपर्ट आहेत. राज ठाकरेंना हे आधी शिव्या घालत होते. राज ठाकरेंनी ऑपरेश सिंदूरवर घेतलेल्या भूमिकेवर यांच्या पक्षाचे लोक त्यांना ट्रोल करत होते. राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल आणि ते राजकीय पोळ्या शेकत असतील तर त्यामध्ये काही बोलावे असे वाटत नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT