Chandrakant Patil : जन्मभूमीतच दादांचा करिष्मा ओसरला, भाजपचे पदाधिकारी शोधण्याची वेळ

Chandrakant Patil Politics : दोन दिवसांपूर्वी दादांचा वाढदिवस झाला. मात्र यंदा कोणत्याच उपक्रमाचा आयोजन पदाधिकाऱ्यांनी केलेले दिसून आले नाही. शिवाय भाजपच्या नगरसेवकांकडून देखील प्रकारे हा उपक्रम टाळल्याचे चित्र आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपमधील एक ज्येष्ठ आणि आदराचे नाव. त्यांची कोल्हापूर जन्मभूमी असली तरी सध्या ते पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन आणण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनीच केलेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पहिल्यांदाच दुहेरी आकडा गाठत 14 नगरसेवक निवडून आणले. गरजू पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना स्थानिक कार्यकर्त्यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने आर्थिक मदतीसह हातभार लावला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरातील बहर ओसरल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री पाटील यांचा वाढदिवस झाला. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पण केवळ दादांच्या जवळच असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताचे फलक झळकवले आहेत. बहुतांश नगरसेवकांनी मात्र दादांच्या वाढदिवसाच्या स्वागताकडेच पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मागील काही वर्षांपासून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे कोल्हापूर भाजप जिल्ह्यासाठी एक उत्सवच होता. मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक संस्थेत उपक्रमांचा आयोजन केले जात होते. अनेक तालीम संस्थांना आर्थिक हातभार देत त्या पुनर्जीवित करण्यासाठी मंत्री पाटील यांच्याकडून प्रयत्न होत असे.

मात्र यंदा मंत्री पाटील यांच्या जन्मभूमीतच दादांच्या करिश्माचा बहर ओसरल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी दादांचा वाढदिवस झाला. मात्र यंदा कोणत्याच उपक्रमाचा आयोजन पदाधिकाऱ्यांनी केलेले दिसून आले नाही. शिवाय भाजपच्या नगरसेवकांकडून देखील प्रकारे हा उपक्रम टाळल्याचे चित्र आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil Dhananjay Mahadik : भाजपमधील संघर्षाचा वणवा स्थानिकला पेटणार? वर्चस्व ठेवण्यासाठी मंत्री पाटील-महाडिकांच्यात ईर्षा

वास्तविक मागील तीन ते चार वर्षापासून मंत्री पाटील आणि कोल्हापुरातील इतर पदाधिकाऱ्यांचा संपर्क कमी झाला आहे. दादा कधी कोल्हापुरात आले आणि गेले याची माहिती केवळ आजूबाजू असणाऱ्या केवळ दोघा तिघांनाच माहिती असते. शिवाय दादापर्यंत जाण्यासाठी काही मोजक्याच जवळच्या व्यक्तींना नेहमी संपर्क करावा लागतो.

त्यांनी त्याला परवानगी दिली तरच मंत्री पाटील यांची भेट घडून येते. असा समज कोल्हापूरकरांचा झाला आहे. त्यामुळे अनेकांना दादांना भेटणे म्हणजे तारेवरची कसरत वाटू लागले आहे. कोथरूडचे आमदार झाल्यापासून कोल्हापूरची बहुतांश संपर्क होत नाही. शिवाय दादांनी ज्या लोकांना जवळ केले आहे. ते लोक दादांना इतरांपासून भेटण्यासाठी दूर ठेवतात असा समज लोकांचाच झाला आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : 'काळजी करू नका! महायुतीबाबत योग्यच निर्णय'; चंद्रकांतदादांचा स्वबळाबाबत सूचक इशारा

शिवाय भाजपमधील अंतर्गत वाद देखील त्याला कारणीभूत आहे. जे पदाधिकारी मंत्री पाटील यांना भेटतील किंवा भाजपच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना भेटतील, त्यांच्याबद्दल 'त्यांच्या जवळचा, ह्यांच्या जवळचा' असा गैरसमज निर्माण होत असल्याने शक्यतो अनेक पदाधिकारी मंत्री पाटील यांची भेट टाळण्याचे देखील दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com