Sushma Andhare News : सामाजिक कार्यकर्त्या यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या फेब्रुवारी महिन्यात अजित पवारांना भेटल्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अंजली दमानिया यांच्यावर टीका केली.
'मी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्या नेत्यांना भेटते त्यांच्याशी काय बोलते याचा अहवाल मी माझ्या पक्षप्रमुखांना नक्की द्यायला हवा. पण तुमच्यासारख्या इतरांच्या पे रोल वर काम करणाऱ्यांना मी स्पष्टीकरण द्यावी इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. पण तुमचा बुरखा फाडणे गरजेचे आहे, असे म्हणत अंधारे यांना चॅलेंज दिले.
'धनंजय मुंडे यांची शिकार तुम्ही केली या भ्रमात तुम्ही असाल तर लवकर जग्या व्हा! जनमताचा रेटा इतका होता की मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. तुमचं फार योगदान आहे, या भ्रमातून बाहेर या. जसे उज्वल निकमने कसाबला फाशी देण्यात मोठे योगदान दिले हा एक मोठा भ्रम आहे. ( तिथे कुणीही असतं तर कसाबला फाशीच झाली असती)! तसाच मुंडेंचा गेम तुम्ही केला हा तुमचा फाजील आत्मविश्वास आहे.', असा टोला दमानियांनी अंधारे यांनी लगावला.
'भाजपाला जे जे डोईजड वाटतात भाजपा त्याला पद्धतशीर संपवते. हे एव्हाना धनंजय मुंडे यांच्या सुद्धा लक्षात आलेच असेल. असो, तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढता अशी तुमची ख्याती आहे म्हणे मग आता काही प्रश्न तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेंची चूल कशी पेटते ? धनंजय मुंडे यांना मोठे करणारे शरद पवार होते. असे म्हणत कायम पवार किंवा ठाकरे यांना लक्ष करणाऱ्या तुम्ही भाजप आणि भाजपच्या नेत्यांबद्दल तुमच्या मनात ममत्व भाव का आहे?', असा प्रश्न देखील सुषमा अंधारे यांनी दमानियांना केला.
'नागपूर मध्ये संकेत बावनकुळे प्रकरणात तुम्ही काही बोलताना दिसलच नाही. मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी जे कार्यालय भाड्याने घेतले त्या कार्यालयाचे फक्त भाडं पावणेचार कोटी दाखवणाऱ्या आयोगाच्या गैरकारभारावर बोलायला तुम्हाला वेळ आहे का ? आयोगावर काम करणाऱ्या पाटील या व्यक्तीची प्रतिनियुक्ती गिरीश महाजन यांच्या पत्रावर झाली म्हणून तुम्हाला यावर बोलावसं वाटत नाही का? राधाकृष्ण विखे पाटलांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक करत नऊ कोटी रुपयांचा अपहार केला माननीय सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला यावर तुमचं एका वाक्याने ट्विट आलं नाही, असा सवाल देखील अंधारेंनी दमानियांना विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.