
Mahayuti Vs MVS : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, या योजनेतील निधीसाठी सरकारने दलित आणि आदिवासींच्या निधीवर डल्ला मारल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी करत थेट आकडेवारीच जाहीर केले.
अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले. सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले. अश्या प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले.
नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही, या नियमाची आठवण देखील दानवे यांनी करून दिली.
विजय वडेट्टीवार यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचा निधी वळवण्यात आल्याचा दावा केला आहे. ते एका योजनेसाठी राज्यातील इतर गरजूंची परवड सुरू आहे. या सरकारचा कारभार प्रश्न उपस्थित करणारा आहे. सगळा दिखावा आहे,यांनी एक निर्णय घ्यायचा, दुसऱ्यांनी टीका करायची आणि जनतेला भूलथापा द्यायचे सुरू आहे. निधी पळवून झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री आता निधी वळवून झाल्यावर राग व्यक्त करतात आपल्या खात्यात काय सुरू आहे हे सुद्धा मंत्री शिरसाठ यांना माहिती नाही, असे टोलाही वडेट्टीवार यांनी शिरसाठ यांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.