Legislative assembly orders IAS suspension: अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ दोन IAS अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी गुरुवारी दिले होते.
त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून निलंबनाची फाईल्स पर्यावरण विभागाने मुख्यमंत्र्याकडे दिली असल्याची माहिती आहे. IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग, सतीश पडवळ यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्याकडे या संदर्भातील फाईल्स पर्यावरण विभागाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'चंद्रपूरमधील आमदारानी पर्यावरणासंदर्भात सभागृहात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. त्याला त्यांना उत्तर देता आले नाही. मुंडे यांनी सभागृहात सांगितले की, अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले होते. मात्र, त्यांनी ब्रिफींग दिले नाही. त्यांना वारंवार बोलवून देखील ते उपस्थित राहिले नाहीत.'
तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी यांची गंभीर देखली देत तत्काळ संबंधित अधिकाऱ्याला निलंबीत करण्याचे करा आदेश दिले होते. त्यामुळे आज प्रदुषण नियंत्रण मंडळातील सदस्य, सचिव असलेले IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग त्यांना निलिंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पर्यावरण विभागाने निलंबीत करण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडे दिली आहे. सहसंचालक सतीश पडवळ यांना देखील निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी निलंबनाच्या आदेशा विष बोलताना यी सांगितले की, अधिकारी माहिती देत नसतील, सहकार्य करत नसतील तर तो सभागृहातील सर्व आमदारांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. अधिकारी हा किती मोठा असला तरी त्याला त्याची जबाबादरी दाखवून देणे हे आमचं काम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.