Jagdeep Dhankhar : दाढीवाल्या लोकांना पाहिलं की..! जगदीप धनखड थेट बोलले, सगळेच चकित...

Ex Vice President India statement : सोशल मीडियात जगदीप धनखड यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यांनी हे विधान नेमंक कुणाला उद्देश केले आहे की, याची चर्चा रंगली आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharSarkarnama
Published on
Updated on

Viral political statement : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मागीलवर्षी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. या राजीनामा बॉम्बने देशाच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. त्यानंतर अनेक महिने धनखड सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले नव्हते. मागील काही दिवसांपासून ते पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र आहे.

जगदीप धनखड यांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थानातील चुरू जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी माजी खासदार राम सिंह कसवा आणि माजी आमदार कमला कसवा यांची घरी जाऊन भेट घेतली. धनखड यांच्या स्वागतासाठी कुटुंबातील व्यक्तींसह गावातील इतरही काही व्यक्ती उपस्थित होते.

स्वागतादरम्यान गावातील एका व्यक्तीला पाहत त्यांनी गंमतीमध्ये म्हटले की, ‘बरं झालं तुम्ही दाढी ठेवली नाही. दाढीवाल्यांना पाहिलं की मी घाबरतो. माझे ओएसडीही त्यांच्या दाढीने मला घाबरवतात.’ यावेळी तिथे उपस्थित सर्वचजण चकित होऊन हसू लागले. धनखड यांनी हे विधान गंमतीत केले असले तरी आता त्यावरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

Jagdeep Dhankhar
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; मद्य धोरण घोटाळ्याचा निकाल लागला, केजरीवाल ढसाढसा रडले...

सोशल मीडियात धनखड यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यांनी हे विधान नेमंक कुणाला उद्देश केले आहे की, याची चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही आता त्याचे भांडवल केले जाऊ लागले आहे. धनखड यांनी आपल्या पक्षातील दाढी असलेल्या नेत्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.

Jagdeep Dhankhar
Rajya Sabha election : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत नाव जाहीर...

दरम्यान, धनखड यांनी राजस्थानातील एका कार्यक्रमात आपण आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला असे म्हटले नव्हते, असे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा नेमका कोणत्या कारणासाठी दिला, यावरूनही जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मी जेव्हा म्हटलं होतं की, मी उपराष्ट्रपतीपद त्यागतो आहे तेव्हा मी कधीही हे म्हटलं नाही की, आजारी आहे. मी म्हटलं होतं की, मी आरोग्याला महत्व देत आहे. आरोग्याला महत्व द्यायलाही हवं, कारण आपल्या शास्त्रांमध्येही सांगितलं आहे. मी अनेकदा अशा गोष्टी बोललो ज्यामुळं लोकांना त्याचा राग यायचा पण मी थेटपणे बोलायचो, असंही पुढे जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com