Satej patil, Swapnil Kusale, CM Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Swapnil Kusale : कोल्हापूरच्या पठ्ठ्याची ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी! मुख्यमंत्र्यांची शाबासकी अन् सतेज पाटलांकडून मोठं बक्षीस

Swapnil Kusale Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rahul Gadkar

Swapnil Kusale Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. तर आमदार सतेज पाटलांनी देखील मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

स्वप्नीलचं अभिनंदन करताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, "महाराष्ट्रातील कोल्हापुरचा असणाऱ्या स्वप्नील कुसाळे याने चांगली कामगिरी केली. त्याबद्दल मी त्याचं कौतुक आणि अभिनंदन करतो. त्याच्या पालकांचं देखील अभिनंदन करतो आणि स्वप्नीलला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. शिवाय त्याला जी काही मदत करायची असेल ती मदत राज्य सरकारकडून केली जाईल."

तर स्वप्नीलने ऑलम्पिकमध्ये पदक पटकावतात त्यांने कोल्हापुराच्या शिरपेचात मानचा तुरा खोवला आहे. त्यामुळे कोल्हापुरसह स्वप्नीलच्या गावात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा करण्यात येत आहे. तर त्याच्या आई-वडिलांनी स्वप्नीलकडून आम्हाला पदकाची अपेक्षा होतीच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापुरात (Kolhapur) पदक मिळवल्याचा आनंद सर्वांनाच झाला असून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर, पेढे वाटून आनंद साजरा करण्याचे नियोजन केले आहे. तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वप्नील कुसाळे याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांनी पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये कास्यपदक मिळवल्याबद्दल स्वप्नीलचे हार्दिक अभिनंदन केलं आहे. स्वप्नीलला 2021 मध्ये आम्ही ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मानित केलं होतं. स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आमदार सतेज पाटील व माझ्यातर्फे 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत असल्याची घोषणा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT