Suhas Diwase on Pooja Khedkar: ‘मला एकटीला त्यांनी रुममध्ये बोलावलं’, पूजा खेडकर यांच्या आरोपांवर दिवसे म्हणाले, ...मोजून तीन वेळा भेटलो!

Suhas Diwase Denies Sexual Harassment Allegations by Pooja Khedkar: 14 जूननंतर पूजा यांना विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले होते. तेथे रुजू होताना पूजा यांनी कोणताही आरोप केला नाही.
Suhas Diwase on Pooja Khedkar
Suhas Diwase on Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी केला होता.

खेडकर यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी अर्ज केला आहे.'ते मला एकटीला खोलीत बोलावित होते', त्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी आपली बदली करण्यासाठी राज्य सरकारकडे अहवाल पाठविला, असा आरोप खेडकर यांनी केला आहे.

या आरोपांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी उत्तर दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर या 3 ते 14 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित होत्या. या कालावधीत आपण खेडकर यांना मोजून तीन वेळा भेटलो.

या सर्व भेटी प्रशासकीय कामाच्या होत्या. यावेळी आमच्याबरोबर इतर अधिकारी तसेच वकील देखील उपस्थित होते. पूजा यांनी केलेले सर्व आरोप रचलेले असून बिनबुडाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

Suhas Diwase on Pooja Khedkar
Siddharth Shirole Pune News : काम काँग्रेस नगरसेवकाचे, श्रेयासाठी भाजप आमदार पुढे?

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची नियुक्ती असताना पूजा यांना आपण एकटा असताना कधीही भेटलो नाही. किंवा एकटा असताना कधीही चर्चा केलेली नाही. 14 जूननंतर पूजा यांना विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले होते. तेथे रुजू होताना पूजा यांनी कोणताही आरोप केला नाही. त्यांच्याबद्दल आपण राज्य सरकारला पत्र लिहिले होते.

त्यावर राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात, आणि माझ्या पत्राला उत्तरात देखील त्यांनी असा कोणताही आरोप केलेला नाही. जेव्हा त्यांना वाशिमला पाठविण्यात आले तेव्हा तिने जाणूनबुजून अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तिने असे का केले हे सर्व जाणतात, असेही जिल्हाधिकारी दिवसे यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com