Prakash Ambedkar Vijay sarkarnama
महाराष्ट्र

Tamil Nadu Politics : तामिळनाडूमध्ये राज्यपालांच्या 'खेला', थलपती विजयला सत्ता स्थापनेपासून रोखले; प्रकाश आंबेडकरांनी करून दिली'त्या' दोन घटनांची आठवण!

Rajendra Arlekar Prakash Ambedkar Vijay : तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट आला आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या भूमिकेमुळे अभिनेता विजय याच्या पक्षाची कोंडी झाली आहे.

Roshan More

Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेत नवा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेला 118 आमदारांचा पाठींबा असलेले पत्र देण्यास राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितले आहे. टीव्हीके आणि काँग्रेस मिळून 113 आमदारांचा पाठींबा अभिनेता विजय याला आहे.

दरम्यान, राज्यपाल यांच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संविधानिक पंरपरेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपाल सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित करत असतात. त्यानंतर तो पक्ष विधीमंडळात आपले बहुमत सिद्ध करत असतो. मात्र, त्यापूर्वीच राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने राज्यपालांच्या आडून 'खेला' होत असल्याची टीका होत आहे.

या सर्व प्रकारावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाला, जो तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यपालांनी मुख्यमंत्री बनून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे.

'टीव्हीकेकडे बहुमत नसल्याच्या शंकेमुळे राज्यपाल विजय यांना दिलेले आमंत्रण नाकारू शकत नाहीत. अनुच्छेद १६४ (२) नुसार, विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विधानसभेचा विश्वास संपादन करून आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.'

बहुमत नसताना देखील सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले गेले होते. याची दोन उदाहरणे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली आहेत. ते म्हणाले, यापूर्वी १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, काँग्रेस (आय) हा १९४ जागांसह सर्वात मोठा पक्ष होता आणि राष्ट्रपती रामास्वामी व्यंकटरमण यांनी त्यांना सर्वप्रथम आमंत्रित केले होते, परंतु राजीव गांधी यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला. माझे मित्र, नॅशनल फ्रंटचे नेते व्ही. पी. सिंग यांना राष्ट्रपतींनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि २ डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

दुसरे उदाहरण देताना त्यांनी म्हटले की, १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु त्यांच्याकडे बहुमत नव्हते, ज्यामुळे त्रिशंकू संसद निर्माण झाली. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. परंतु लोकसभेतील अविश्वास ठरावात बहुमत मिळवता न आल्याने, १३ दिवसांनंतर, २८ मे १९९६ रोजी त्यांनी राजीनामा दिला.

...बहुमत सिद्ध करावे लागेल

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी आणि विजय यांना तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी योग्यरित्या आमंत्रित केले पाहिजे. त्यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT