Thalapathy Vijay : थलापती विजयचं मुख्यमंत्रिपद धोक्यात? शपथ घेण्यापूर्वीच 2015 मधील 'त्या' प्रकरणी FIR दाखल करण्याची हायकोर्टात मागणी

Thalapathy Vijay income tax case : एकीकडे टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलापती विजय यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विजय यांनी राज्यपालांकडे 112 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र दिलं असतानाच दुसरीकडे त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Thalapathy Vijay TVK | Madras HC | Income Tax Case
TVK chief Thalapathy Vijay addresses supporters amid political developments and a fresh Madras High Court case linked to alleged income tax irregularities.Sarkarama
Published on
Updated on

Thalapathy Vijay TVK : तमिळनाडूमध्ये पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवत थेट सत्तास्थापन करण्या एवढ्या जागा मिळवलेले टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलापती विजय यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

एकीकडे विजय यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे.

विजय यांनी राज्यपालांकडे 112 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र दिलं असतानाच दुसरीकडे त्यांच्या विरोधात कथित आयकर अनियमिततेप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच विजय यांच्यावर मोठं संकट ओढावलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा जासेफ विजय यांच्या विरोधात मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका 2015 साी प्रदर्शित झालेल्या पुली या चित्रपटाशी संबंधित आहे. पुली चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयकर विभागाने विजय यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती.

Thalapathy Vijay TVK | Madras HC | Income Tax Case
Suvendu Adhikari PA Death : ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला पुढं जाऊ दिलं अन् तिथेच घात झाला; हल्लेखोरांनी सुवेंदू अधिकारींच्या पीएला नेमकं कसं संपवलं?

या छापेमारी दरम्यान काही आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, विजय यांच्या विरोधातील याचिका सुरुवातीला स्वीकारण्यात आली नव्हती. मात्र, मुख्य न्यायाधीश सुशांत अरविंद धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी अरून मुरुगन यांच्या खंडपीठाने रजिस्ट्रारला ती नोंदवण्याचे निर्देश दिल्यामुळे आता या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Thalapathy Vijay TVK | Madras HC | Income Tax Case
BJP Suvendu Adhikari aide shot dead : राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PAवर अंदाधुंद गोळीबार, जागीच मृत्यू

याचिकेमध्ये, चित्रपट निर्मात्याने विजय यांना 16 कोटी चेकद्वारे आणि 4.93 कोटी रोख दिल्याचा दावा केला असून त्यांनी कर केवळ चेकद्वारे दिलेल्या रकमेवरच भरला असून उर्वरीत रकमेवर कर भरला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com