Maharashtra School Strike Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra School Strike: शिक्षकांचा आरपारचा इशारा! राज्यातील शाळा दोन दिवस बंद; मुंबईत मोठं आंदोलन

Teachers Protest Maharashtra: राज्यातील अंशतः अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७ आणि ८ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली आहे.

Mangesh Mahale

बातमी थोडक्यात काय आहे?

  1. ७ आणि ८ जुलैला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा

  2. हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार

  3. वेतन, अनुदान आणि सेवा नियमितीकरणाच्या मागण्यांसाठी आंदोलन

  4. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

Mumbai News: राज्यातील अंशतः अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आता आरपारच्या लढ्याचा इशारा दिला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने ७ आणि ८ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली असून, या दोन दिवसांत राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर धडक देणार आहेत.

सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान, वेतन सुधारणा, सेवा नियमितीकरण आणि इतर आर्थिक मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे, अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी दिली.

सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षक समन्वय संघाने दिला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक-दोन दिवसांचा तोटा होईल, मात्र दीर्घकाळ न्याय मिळवण्यासाठी हा त्याग आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

दरम्यान, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT