

EPFO Interest Rate for FY 2025-26: देशातील तब्बल ७ कोटी कर्मचारी आणि पीएफ खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांवर आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर देण्यास केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता EPFO लवकरच सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामुळे कोट्यवधी खातेदारांच्या खात्यात याच महिन्यात व्याज जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी २ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. आता मंत्रालयाने त्याला हिरवा कंदील दिला आहे.
EPFO शी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, जून महिन्यातच सदस्यांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. व्याज जमा झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या पासबुकमध्ये त्याची नोंद पाहता येणार आहे.
यंदा EPFO ने आपली डिजिटल प्रणाली अधिक सक्षम केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्याज जमा करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, EPFO ने सलग तिसऱ्या वर्षी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. यापूर्वी २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठीही हाच व्याजदर लागू करण्यात आला होता. तर २०२२-२३ मध्ये EPF वर ८.१५ टक्के व्याजदर देण्यात आला होता.
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून पासबुकमध्ये व्याजाची रक्कम तपासता येईल.
UMANG अॅपद्वारे PF बॅलन्स आणि व्याज जमा झाल्याची माहिती पाहता येईल.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल देऊनही खाते माहिती मिळू शकते.
SMS सेवेच्या माध्यमातून EPF खात्यातील अपडेट्स तपासता येतात.
या सर्व सुविधा वापरण्यासाठी UAN नंबर सक्रिय आणि आधारशी लिंक असणे आवश्यक आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.