Tehsildar Pratiksha Tejankar sarkarnama
महाराष्ट्र

Tehsildar Pratiksha Tejankar : तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या अडचणीत वाढ, चौकशी समिती गठीत, 'ते' रील भोवणार?

Tehsildar Pratiksha Tejankar Trouble : तहसील कार्यालयात 'सिनेमॅटिक' रील बनवून चर्चेत आलेल्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चौकशी समितीने तहसील कार्यालयात येत झाडाझडती घेतली.

Roshan More

Pratiksha Tejankar Inquiry : गेल्या महिन्यात तहसील कार्यालयात 'सिनेमॅटिक' रील केल्यामुळे वाशिममधील रिसोड तालुक्यातील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या चर्चेत आल्या होत्या. शासकीय नियमांचा भंग करत रील केल्यामुळे त्यांच्यावर टीका देखील होत होती. दरम्यान, आता या प्रकरणात तेजनकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

अमरावतीच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी तहसील कार्यालयातील रील्स प्रकरणी विशेष चौकशी समिती गठीत केल्याची माहिती आहे. या विषयी 'साम टिव्ही'ने वृत्त दिले आहे.

विभागीय आयुक्तांनी गठीत गेलेल्या चौकशी समितीच्या पथकाने रिसोड तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली. याप्रकरणी अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या आठवड्यातच हा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, चौकशी पथकातील सदस्यांना या विषयी पत्रकरांनी विचारले असता ते म्हणाले, चौकशी सुरू आहे, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

नेमके काय 'रील'मध्ये काय?

सिनेमॅटीक पद्धतीने शूट केलेल्या तहसीलदार तेजनकर यांच्या रीलमध्ये त्या कार्यालयामध्ये येत आहे. आपल्या खूर्चीवर बसून स्वाक्षरी करत आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो, रील किंवा व्हिडिओ अपलोड करताना शासकीय पदनाम, लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तेजनकर यांनी आपल्या रीलमध्ये "तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी" असा नावाचा फलक, शासकीय खुर्ची, राष्ट्रीय ध्वज आणि बोधचिन्ह स्पष्टपणे दाखवून नियमालाच केराची टोपली' दाखवल्याची तक्रार आहे.

.

'त्या' नियमाला हरताळ

परिपत्रकातील नियम ८ आणि ९ मध्ये शासकीय कामाचे प्रदर्शन करताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना "स्वयंप्रशंसा" होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. दरम्यान, या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' अन्वये कडक शिस्तभंगविषयक कारवाईची तरतूद आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT