Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंच्या टार्गेटवर आता नाशिक महापालिकेच्या शाळा ; प्रत्यक्ष पाहणीसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज

Abhijit Dipke Seeks Inspection of Nashik Municipal Schools : क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपला मोर्चा आता नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांकडे वळवला आहे.
Abhijit Dipke Seeks Inspection of Nashik Municipal Schools
Abhijit Dipke Seeks Inspection of Nashik Municipal SchoolsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Municipal Schools : राज्यभरातील शाळांमधील सुविधांची तपासणी करण्यासाठी क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आता नाशिक महापालिकेच्या शाळांचीही प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय दीपके यांनी घेतला असून, त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केला आहे.

दीपके यांनी यापूर्वी नाशिक विभागातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांची पाहणी केली. त्यानंतर आता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शाळांसह महापालिका शाळांकडे मोर्चा वळवला आहे. नाशिक शहरातील महापालिका शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे लेखी अर्ज सादर केला असून विभागाच्या प्रतिसादाकडे आता लक्ष लागले आहे.

नाशिक महापालिकेमार्फत सुमारे शंभर शाळा चालविल्या जातात. या शंभर शाळांमध्ये जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे.

Abhijit Dipke Seeks Inspection of Nashik Municipal Schools
Abhijeet Dipke on Protest : ज्ञानेश कुमारांच्या विरोधात CJP आक्रमक, आंदोलनाची तारीख अन् जागा जाहीर, दीपके म्हणतात - 'उद्यापर्यंत...'

महापालिका शाळांतील वर्गखोल्यांची अवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची स्थिती, फर्निचर, संगणक आणि डिजिटल सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शिक्षकांची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या इतर मूलभूत सोयींची पाहणी करण्यात येणार असल्याचे दीपके यांनी अर्जात नमूद केले आहे.

शाळांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटींचा सविस्तर अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशाराही दीपके यांनी दिला आहे. दीपके यांच्या या पुढाकारामुळे महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेतील प्रत्यक्ष चित्र समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Abhijit Dipke Seeks Inspection of Nashik Municipal Schools
Government Recruitment Exams : पेपरफुटी टाळण्यासाठी सरकारी भरती परीक्षांमध्ये मोठे बदल होणार; ‘मॉडेल कोड ऑफ कंडक्ट’ तयार करणार

स्वत:च्या मूळ गावापासून केली सुरुवात

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके यांनी राज्यभरात स्कूल ठिक करो अभियान सुरु केलं. या अभियानाची सुरुवात त्यांनी त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषदत शाळेतून केली. शाळेच्या पाहणी दरम्यान त्यांना विदारक चित्र पाहायला मिळालं. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे बेंच नव्हते. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या आणि त्या झाकण्यासाठी बॅनरचा वापर केलेला दिसला.

विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाहीत, पिण्याचे पाणी नाही, स्वच्छ स्वच्छतागृहे नाहीत, संगणक बंद आहेत आणि पुरेसे शिक्षकही नाहीत, अशा समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्याचे त्यांनी सांगितलं होतं. शाळेतील विदारक स्थिती पाहून त्यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका केली. सरकारी शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा अधोरेखित करताना त्यांनी सरकारच्या हेतुवर प्रश्नचिन्ह उपस्थिीत केले होते. त्यानंतर त्यांनी आपले हे अभियान अधिक आक्रमकपणे पुढे चालू ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com