पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात सक्रीय नाही, पणे वन्यजीव छायाचित्रण (Wildlife Photography) हा त्यांचा आवडता विषय आहे. वाईल्डलाईफ फोटोग्राफी करताना तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या अनेक प्रजातींचा शोध लावला आहे. त्यातला एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे.
तेजस ठाकरे यांनी नुकतीच 'ईल’ माशाची नवीन प्रजाती शोधली आहे. याबाबतची माहिती तेजस ठाकरे यांनी आपल्या इंस्टाग्रामवरुन दिली आहे. ''मासा 'रक्थमिच्तिस' या प्रजातीचा आहे. ज्याला गोड्या पाण्यातील 'ईल' असेही म्हटले जाते, अशी माहिती तेजस यांनी इंस्टाग्रामवरुन दिली आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये तेजस ठाकरे यांनी लिहिले आहे की, 'काही वर्षांपूर्वी आम्हाला ही नवीन प्रजाती सापडली होती, आम्ही कोरोना काळात त्यावर बरंच काम केलं आणि आता आम्ही त्याविषयीची माहिती जगासमोर आणत आहोत.' 2019 मध्ये तेजस ठाकरे आणि त्यांच्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतील जोगेश्वरीमधील एका शाळेतील छोट्या विहिरीत माशाची ही दुर्मिळ प्रजाती आढळून आली होती. यावर तेजस ठाकरे आणि त्यांच्या मित्रांनी बरंच संशोधन केलं. ज्यानंतर ‘ॲक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथोलॉजी’या संशोधनपत्रिकेत त्यांचा या माशाच्या नव्या प्रजातीविषयी छापून आलं.
ईल माशाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ समजली जाते. कारण भूगर्भातील गोड्या पाण्यात हा मासा आढळून येतो. रक्थमिच्तिस प्रजातीमधील हा मासा दिसायला देखील फारच वेगळ्या स्वरुपाचा आहे. या माशाचा आकार साधारण 32 सेटींमीटर एवढा आहे. ज्याचा रंग हा गुलाबी आहे. हा मासा आपल्या शरीरातील संवेदनांच्या माध्यमातून आपले भक्ष्य शोधतो. ईल या माशाची प्रजाती ही अंध आहे. भूगर्भातील गोड्या पाण्यामध्ये पूर्णपणे अंध अशा स्वरुपाची ही माशाची प्रजाती आहे.
गेल्या वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध त्यांनी लावला होता. कर्नाटकमध्ये असलेल्या सकलेशपूरच्या जंगाल उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून आल्या आहेत. तेजस ठाकरे यांच्या इंस्टापेजवरही या पालींचे आणि खेकड्यांचे फोटो आहेत.
Edited by : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.