Pune News: सरकारी शाळांनंतर आता शिक्षण विभागाने खासगी, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांच्या पात्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे. या शाळांमधील शिक्षक ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) पात्र आहेत का, याची झाडाझडती घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
उशिरा जाग आलेल्या शिक्षण विभागाने ‘यूडायस’ प्रणालीद्वारे शिक्षकांच्या टीईटी पात्रतेबाबतची माहिती पाठवण्याच्या, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत शिक्षकांची टीईटी पात्रता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
राज्यात शासकीय शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वच शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र, आतापर्यंत ही कारवाई केवळ शासकीय किंवा अनुदानित शाळांमधील शिक्षकांपुरतीच मर्यादित होते.
खासगी शाळांमध्ये नक्की किती शिक्षक टीईटी पात्र आहेत, याची ठोस माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नव्हती. तसेच, आता कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटी पात्र होण्यासाठी मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या निकालानुसार, देशातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य असून, त्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत दिली आहे.
यूडायस अहवालानुसार, राज्यात सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये जवळपास सात लाखांहून अधिक शिक्षक आहेत. त्यामुळे आता गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची पडताळणी शिक्षण विभागाकडून केली जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.
याबाबत बोलताना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, सर्वच शाळांमधील शिक्षकांना टीईटी पात्रता असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता राज्यातील खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेबाबतची तपासणी केली जाणार आहे.
खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत असणार आहे. त्यामुळे यूडायस प्रणालीद्वारे शिक्षण संस्था, शिक्षकांकडून टीईटी पात्रतेबाबतची माहिती संकलित करण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.