TET Paper Leak : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटी प्रकरणाचा मुख्य सुत्रधाराची ओळख पोलिसांनी पटवली आहे. पोलिसांनी बिहारमधील एका व्यक्तीला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानले असून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरियाणात पोलीस पथके रवाना केली आहेत.
बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला विजेंद्र गुप्ता हा या रॅकेटचा म्होरक्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींनी तोच मुख्य सूत्रधार असल्याची कबुली दिली आहे. तपास अधिकार्यांचा असा दावा आहे की, गुप्ता गेल्या २५ वर्षांपासून ओडिशा, मध्य प्रदेश आणि बिहारमधील विविध परीक्षांचे पेपर लीक करण्याच्या गुन्ह्यांमध्ये सामील आहे.
भिवंडी न्यायालयाने रविवारी टीईटी पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना राजीव शाह (४५), पाटण्याचाच आकाश कुमार उर्फ सूरज सिंग (३०) आणि हरियाणाच्या पानिपतचा धीरज सिंग (२८) यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.