Raj Thackeray and Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray Brothers Mumbai Morcha: ठाकरे बंधूंच्या मोर्चात मोठी घोषणा होणार? हिटलिस्टवर ज्ञानेश कुमार

Thackeray brothers march News : शिवसेना आणि मनसेने गर्जना मोर्चासाठी मोठी तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती.

Sachin Waghmare

Mumbai News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात रविवारी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीने "गर्जना" मोर्चा काढण्यात येणार आहे. 'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने रविवारी सकाळपासूनच शिवसैनिकांनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी ठाकरे बंधूंच्यावतीने काढण्यात येणाऱ्या गर्जना मोर्चानंतर सभा होणार आहे. या सभेवेळी राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हिटलिस्टवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे कथित वादग्रस्त निर्णय असणार आहेत. त्यामुळे यावर दोन्ही बंधू काय बॊलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पूर्वी ईव्हीएम मशीनबाबत त्यांचा आक्षेप होता. तर त्याचवेळी निवडणूक याद्यांमध्ये घोळाचाही आरोप करण्यात आला होता.

हिंदी भाषेच्या सक्तीनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी सत्याचा मोर्चा, तिरंगा मोर्चा काढला. आता ठाकरे बंधू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी गर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे. रविवारी मुंबईत सकाळी गर्जना मोर्चा निघणार आहे. त्यानंतर होत असलेल्या सभेत ठाकरे बंधूंच्या रडारवर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोर्चानंतर जाहीर सभा

शिवसेना आणि मनसेने गर्जना मोर्चासाठी मोठी तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. तर इकडे उद्धव सेनेने सुद्धा मोर्चाची तयारी केली आहे. सकाळी हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघेल. यापूर्वी तो भायखळा येथून निघणार होता. पण त्याच्या मार्गात बदल करण्यात आला. हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ येईल. या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर होईल. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह इतर नेते मोर्चात काय गर्जना करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार पोस्टरबाजी

सीजेपी आंदोलनासारखेच मुंबईत होत असलेल्या ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चामध्ये सुद्धा विविध पोस्टर लावलेले दिसत आहेत. या मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेल्या तरुणांच्या हातात वेगवेगळे पोस्टर दिसत आहेत. त्यामध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार पोस्टरबाजी केल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT