Abhijeet Dipke FIR: अभिजीत दिपकेंसह सुमारे ५०० जणांवर गुन्हा दाखल! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढणार?

Abhijeet Dipke FIR: मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात २ ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीनं आयोजित केलेल्या 'जेल भरो' आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिजीत दिपकेंसह इतर सुमारे ५०० अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे.
Abhijeet Dipke at Shivaji Park
Abhijeet Dipke at Shivaji Park
Published on: 
Updated on: 

Abhijeet Dipke FIR: मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात २ ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीनं आयोजित केलेल्या जेलभलो आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिजीत दिपकेंसह इतर सुमारे ५०० अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे का दाखल झाले?

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी आणि इतर कृत्यांसाठी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या तक्रारीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याची चौकशी सुरु आहे, अशीही माहिती या पोलीस अधिकाऱ्यानं दिल्याचं माध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

Abhijeet Dipke at Shivaji Park
Purnekar Murder: प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी मुलगा पुरावे घेऊन पोलीस ठाण्यात दाखल! नेमकं कोणी रचला कट?

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीनं निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेत कथित घोटाळ्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शुक्रवारी शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन केलं. यावेळी हाजारोंच्या संख्येनं जेन झी मंडळी, नागरिक आणि बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रेटी यांनी हजेरी लावली होती.

पोलिसांची परवानगी नाकारली

कॉक्रोच जनता पार्टीनं आधीच २ ऑक्टोबरला शिवाजी पार्क मैदानात निषेध आंदोलन केलं जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यासाठी इथं घोषणा दिल्यास, भाषणं केल्या, लाऊड स्पीकर्स लावल्यास ध्वनी प्रदुषण होईल, त्याचबरोबर वाहतूक कोंडी होईल अशी चिंता व्यक्त केली होती. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर अभिजीत दिपके यांनी पोलिसांनाच आव्हान देत परवानगी नसताना आंदोलन करण्यासाठी 'जेल भरो' आंदोलनाची घोषणा केली होती. तसंच आंदोलकांना आवाहन केलं होतं की, त्यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात एकत्र यावं. विशेष म्हणजे पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हजारोंच्या संख्येनं इथं तरुणांनी हजेरी लावली.

Abhijeet Dipke at Shivaji Park
UP Election 2027: युपी निवडणुकीची रणधुमाळी! 'संविधान बचाओ, बीजेपी हटाओ'चा थेट नारा देत माजी मंत्र्याचा पक्ष INDIA आघाडीत सामील

स्थानिक रहिवासी आणि अॅड. सिद्धी देवळेकर यांनी याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत सीजेपीचे कार्यकर्ते अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास, रत्ना सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही या सर्वांनी आंदोलनाची हाक दिली आणि प्रत्येक आंदोलनाला संबोधितही केलं, असा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com