navneet rana, Sanjay Raut
navneet rana, Sanjay Raut sarkarnama
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा संजय राऊतांवर भडकल्या

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राऊत म्हणाले, ''केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही ‘दिवाळी गिफ्ट’ वगैरे म्हणता येणार नाही. शिवाय इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही''

राऊतांच्या या विधानावर खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही राणा यांनी हल्लाबोल केला आहे. राणा यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. ''महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राणा यांनी केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यांनतर राऊत यांनी लगावलेल्या टोल्यावर खासदार राणा यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राऊतांवर टीका करताना राणा म्हणतात, ''केंद्र सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे संजय राऊत बोलतात पाच आणि दहा रुपयांनी काय होते. केंद्र सरकारने दर कमी करुन महाराष्ट्राला भेट दिली आहे. तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगावे की दिवाळी भेट म्हणून इंधनावरुन कर आकारल्यानंतर येणारा जो १२ रुपये नफा आहे तो कमी करुन सवलत द्यायला पाहिजे. संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही.’'

''पेट्रोल, डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला असे अजिबात होणार नाही. मुळात केंद्राला जर खरंच ‘दिवाळी गिफ्ट’ द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवे होते. मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही. दिले पण हात आखडता ठेवून दिले असेच या इंधन दरकपातीबाबत म्हणता येईल,'' असे राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT